TMKOC Dayaben Left Show Reason: तारक मेहता का उल्टा चष्मा  (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही देशातील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीनं आपल्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिशा वाकाणीमुळे दयाबेन (Dayaben) हे पात्र घराघरात पोहोचलं. पण दिशा वाकाणीनं (Disha Vakani)  ही मालिका सोडल्याने चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. 'दयाबेन'ची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने आई होणार असल्याने शो सोडला होता आणि प्रसूती रजा घेतली होती. आजही अनेक चाहते दिशा वाकाणीची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान दिशाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने शो सोडण्याचे कारण सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दयाबेन'चं पात्र अडचणीचं ठरलं


एका मुलाखतीदरम्यान दिशा वकानी म्हणाली होती की, 'तिच्या व्यक्तिरेखेचा आवाज कायम ठेवण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली.' जर तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला कळेलच की दयाच्या व्यक्तिरेखेचा आवाज खूपच वेगळा आहे. या विचित्र आवाजामुळे तिला कधीकधी घशाचा त्रास व्हायचा, पण देवाच्या कृपेने तिने हे पात्र यशस्वीपणे साकारले आहे आणि लोकांना तीचं काम आवडलं.


'अमिताभ बच्चन यांना पाहून मी सर्वकाही...', Big B विषयीचं रेखा यांचं ते वक्तव्य चर्चेत


कदाचित याच कारणामुळे दिशा पुन्हा या मालिकेत परतली नाही. पण याच कारणामुळे मालिका सोडल्याचं स्पष्ट नाही. सध्या या शोमध्ये कोणीही दयाबेनची भूमिका साकारत नाही आणि निर्मात्याचे म्हणणे आहे की 'दयाबेन' हे पात्र लवकरच शोमध्ये परत येईल.