'अमिताभ बच्चन यांना पाहून मी सर्वकाही...', Big B विषयीचं रेखा यांचं ते वक्तव्य चर्चेत

रुपेरी पडद्यावर अमिताभ आणि रेखा ही जोडी चित्रपटप्रेमींना चांगलीच भावली होती. ही जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप चर्चेत असायची. या जोडीबाबत आजही अनेक किस्से चर्चेत आहेत. काही मुलाखतींमध्ये रेखानं आपल्या अनोख्या नात्याबाबत खुलासे देखील केले आहेत. 

Updated: Oct 9, 2022, 02:44 PM IST
'अमिताभ बच्चन यांना पाहून मी सर्वकाही...', Big B विषयीचं रेखा यांचं ते वक्तव्य चर्चेत

Amitabh Bachchan Rekha : रुपेरी पडद्यावर अमिताभ आणि रेखा ही जोडी चित्रपटप्रेमींना चांगलीच भावली होती. ही जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप चर्चेत असायची. या जोडीबाबत आजही अनेक किस्से चर्चेत आहेत. काही मुलाखतींमध्ये रेखानं आपल्या अनोख्या नात्याबाबत खुलासे देखील केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्याबाबत  प्रश्न विचारताच त्यांनी मनाला मोकळी वाट करून दिली आहे. असाच खुलासा रेखा यांनी आपल्या एका मुलाखतीत केला होता.

एका मुलाखतीदरम्यान रेखा यांना विचारण्यात आले की अमिताभ बच्चन यांच्याकडे तुम्ही कसे पाहता? या प्रश्नावर रेखा यांनी उत्तर दिलं की, 'जेव्हा अमिताभसोबत 'दो अनजाने' चित्रपट करण्याची संधी मिळाली तेव्हा खूप घाबरली होती. शूटिंगच्या वेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर डायलॉग विसरायची.' रेखाने याच मुलाखतीत पुढे सांगितले होते की, 'अमिताभ यांचा 'दीवार' हा चित्रपट 'दो अनजाने'च्या आधी प्रदर्शित झाला होता आणि त्यांची प्रतिमा सुपरस्टार अशी झाली होती. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना दबाव असायचा.'

T20 World Cup साठी Urvashi Rautela ऑस्ट्रेलियात! नेटकरी म्हणाले, "ऋषभ पंतचे तर..."

अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित आणखी एक किस्सा सांगताना रेखा म्हणाल्या होत्या की, 'ते कधीही चेहऱ्यावर दु:ख दिसू देत नाहीत, हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. कितीही त्रास झाला, पण तरीही कधीच घाबरत नाहीत." रेखा यांनी पुढे सांगितलं की, 'गंगा की सौगंध' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना खूप दुखापत झाली होती, त्यानंतरही अमिताभ यांनी परफॉर्म केले. विशेष म्हणजे एकही ब्रेकही घेतला नाही.'