Taarak Mehta ka Ooltah Chashmah: गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हलकेफुलके विनोद असलेली ही मालिका प्रत्येकाला आपल्या जवळची वाटते. त्यामुळे या मालिकेचे लाखो चाहते आहेत. कित्येक घरात तर एकदा मालिका तासंतास आणि पुन्हा पुन्हा बघितली जाते. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीनं आपल्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिशा वाकाणीमुळे दयाबेन (Dayaben) हे पात्र घराघरात पोहोचलं. पण दिशा वाकाणीनं (Disha Vakani)  ही मालिका सोडल्याने चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. 'दयाबेन'ची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने आई होणार असल्याने शो सोडला होता. पण आता वेगळंच कारण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दयाबेनला गळ्याचा कँसर झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं तारक मेहता शोमधील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी सांगितलं आहे. एका वेबसाईटला दिलीप जोशी यांनी सांगितलं की, 'मला सकाळपासून लोकांचे फोन येत आहे. प्रत्येक वेळी काहीतरी अफवा उडत असते. मी फक्त इतकं सांगती की अफवा आहे आणि त्याकडे लक्ष देऊ नका.' 


कतरिनानं Alia ला शिकवला असा धडा, वेदना होत असूनही केलं दुर्लक्ष, पाहा Video


'दयाबेन'चं पात्र अडचणीचं ठरलं


एका मुलाखतीदरम्यान दिशा वकानी म्हणाली होती की, 'तिच्या व्यक्तिरेखेचा आवाज कायम ठेवण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली.' जर तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला कळेलच की दयाच्या व्यक्तिरेखेचा आवाज खूपच वेगळा आहे. या विचित्र आवाजामुळे तिला कधीकधी घशाचा त्रास व्हायचा, पण देवाच्या कृपेने तिने हे पात्र यशस्वीपणे साकारले आहे आणि लोकांना तीचं काम आवडलं.