मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन सध्या त्याच्या आगामी 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटामुळे तुफान चर्चेत आला आहे. अजय एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत एक चांगल्या स्वभावाचा व्यक्ती देखील आहे. काही दिवसांपूर्वी अजने त्याच्या बॉडिगार्डचा वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये त्याच्या हटके आणि स्टाईलिश लूकने फक्त मुलींच नाही तर मुलांचं देखील लक्ष वेधलं. पांढरी दाढी आणि लांब केस असा अजय लूक चाहत्यांच्या फारचं आवडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर त्याचा नवा लूक तुफान व्हायरल होत आहे. अजयचा नव्या लूकचा फोटो हेयर स्टायलिस्ट आलिम हाकीम याने इन्स्टाग्राम  अकाऊंटवर शेअर केला आहे. अजयचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'डेडली अजय देवगनचा डेडली लूक...' अजयच्या नव्या लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे. 




 
अजय हा नवा लूक त्याच्या आगामी 'Thank God' केला असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक लूक्स करून पाहिल्यानंतर या हटके लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आला. अजयच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अजय लवकरच 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.