तिरुपती : बॉलीवूडमधील मोस्ट फेवरेट कपल म्हणजे दीप-वीर. त्यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी दीप-वीर आपल्या कुटुंबियांसोबत तिरूपती बालाजी येथे गेले आहेत. लग्नाचा पहिला वाढदिवस जोरदार साजरा करणार असल्याचं रणवीरने सांगितलं आहे. वर्षभरापूर्वी दोघांनी इटलीमध्ये जाऊन लग्न केलं होतं. बाजीराव-मस्तानीच्या या लग्नाची चर्चा खूपच रंगली होती. आज तर, दीपिका लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिरूपतीनंतर ते विविध तीर्थस्थळांचं दर्शन घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वात पावरफुल कपल आहे. दोघांची जोडी अनेकांची फेव्हरेट आहे. आज एक वर्षापूर्वी दोघेही विवाहबंधनात अडकले होते.


दीपिका आणि रणवीरच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दीपिका आणि रणवीर शाही लुकमध्ये दिसत होते.


.