मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल. त्यांची पडद्यावरील आणि पडद्यामागची केमिस्ट्री लोकांना फारच भावते.

त्यांच्या प्रेमाच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात. 

 

स्पेशल प्लॅन्स


आता यांचे नववर्षाच्या प्लॅन्स काहीतरी नक्कीच स्पेशल असणार. रणवीर कामानिमित्त श्रीलंकेला जाणार आहे तर दीपिका सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे. मात्र काम संपवून ती रणवीरला श्रीलंकेत भेटणार आहे. आणि प्रसारमाध्यमांपासून दूर जाऊन दोघे एकत्र सेलिब्रेशन करणार आहेत. दोघांना एकत्र वेळ घालवायचा आहे.

 

एकमेकांवर स्तुतीसुमनं


काही दिवसांपूर्वी रणवीर दीपिकाच्या वडीलांना भेटल्याने पुन्हा एकदा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. दोघेही अऩेकदा प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांचे कौतुक करताना दिसतात.