Deepika Kakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड लवकरच तिच्या बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात सध्या दीपिका आहे. दीपिकाच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयी तिचे चाहते आनंदी असताना तिनं चाहत्यांना तिला जेस्टेशनल डायबिटीज या व्याधी झाल्याची माहिती दिली आहे. दीपिकानं यूट्यूबवर व्लॉग शेअर करत ही माहिती दिली आहे. 'दीपिका की दुनिया' या व्लॉगवर तिनं याचा खुलासा केला. तिच्या नुकत्याच केलेल्या रिपोर्ट्समध्ये जेस्टेशनल डायबिटीज दीपिकाला झाल्याचे समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकानं या व्लॉगमध्ये सांगितले की तिला जेस्टेशन डायबिटीज झाला आहे. हा एक प्रकारचा डायबिटीजचा प्रकार आहे. पण याविषयी सांगताना दीपिकानं हे देखील सांगितलं की यात घाबरण्याची गरज नाही. हा आजार साधारणपणे प्रेग्नंट असलेल्या महिलांना होतो. पण असं असलं तरी डॉक्टरांनी तिला स्वत: ची काळजी घेण्यास आणि काही गोष्टी टाळण्यास सांगितले आहे. 


हेही वाचा : Salman Khan ला दुखापत? फोटो शेअर करत म्हणाला, ‘टाइगर जख्मी है'


दीपिका कक्कर तिच्या या व्हिडीओत म्हणाली की 'मी जेस्टेशनल चॅलेंजची एक टेस्ट केली होती. जेस्टेशनल हा देखील एक डायबिटीजचा प्रकार आहे. डायबिटिजचा हा प्रकार प्रेग्नंसीच्या 24-28 आठवड्यात दिसू लागतो. जरी एखाद्या महिलेला प्रेग्संसीआधी डायबिटीज झालेला नसेल तरी सुद्धी या काळात डायबिटीज होण्याची शक्यता असते. नुकत्याच केलेल्या टेस्टमध्ये माझ्या रक्तात साखरेचे प्रमाण खूप जास्त आहेत.'  


दीपिका तिच्या व्लॉगमध्ये पुढे म्हणाली की, 'मी खूप आंबे, भात किंवा मग मिठाई खाल्ली का असं मला वाटायचं, पण मी सर्व काही माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खात होते. हे अगदी सामान्य आहे. गरोदरपणातील डायबिटीज तुम्ही मागील महिन्यांत काय खाल्ले यावर अवलंबून नाही. जसजसं बाळ आणि प्लेसेंटा वाढतात, त्यातून अनेक हार्मोन्स रिलीज होतात. हेच हार्मोन्स इंसुलिन रेसिस्टंटचं काम करते आणि त्यामुळे जेस्टेशनल डायबिटिजचे शिकार होतात. अनेक प्रेग्नंट महिलांना ही व्याधी होते आणि मला देखील झाली आहे.' 



दीपिका पुढे म्हणते, 'मी साखर, बेकरी, खजूर, भात, मिठाई खाऊ शकत नाही आणि मी फक्त सफरचंद, नाशपाती यांसारखी काही फळे खाऊ शकते. व्यायाम खूप महत्वाचा आहे. डायबिटीझमध्ये चालणे हा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. मला यावेळी अॅक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मला आता योग्य आहेत ती औषध देण्यात आली आहेत. मला माझ्या रुटिनमध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे. जेवणानंतर शुगर लेव्हल तपासण्यासाठी एक मशीन वापरते.'