Salman Khan ला दुखापत? फोटो शेअर करत म्हणाला, ‘टाइगर जख्मी है'

Salman Khan Injured : सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला दुखापत झाल्याचे सांगितले आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी कमेंट करत त्याला लवकरात लवकर ठीक हो असं म्हणतं होते. 

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2023, 07:06 PM IST
Salman Khan ला दुखापत? फोटो शेअर करत म्हणाला, ‘टाइगर जख्मी है' title=
(Photo Credit : Salman Khan Instagram)

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. सलमानचे लाखो चाहते आहेत. त्याचे हे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना आपण पाहतो. काही दिवसांपासून सलमान हा त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता सलमान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमानला दुखापत झाली आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

सलमान खाननं हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत सलमान खान शर्ट लेस असून चेहरा दाखवत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे त्याला पाठीला दुखापत झाली आहे. तर त्याच्या खांद्याजवळ झालेल्या या जखमेवर काही स्क्रेप बॅन्डड लावण्यात आले आहेत. हा फोटो शेअर करत सलमाननं कॅप्शन दिलं की जेव्हा तुम्हाला वाटतं आपणचं आपल्या खांद्यावर संपूर्ण जगाच ओझ उचलत आहोत तेव्हा तो बोलतो की जग सोड तू फक्त पाच किलोचं डंबल उचलून दाखव. या सोबत सलमाननं कॅप्शनमध्ये टायगरजख्मी आणि टायगर 3 हे हॅशटॅग वापरलं आहे. सलमानला ही जखम तो जेव्हा वर्कआऊट करत होता त्यावेळी झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण नक्की त्याला ही दुखापत शूटिंग करताना झाली की वर्कआऊट करताना हे कोणाला नक्की माहित नाही.सलमानच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'स्ट्रॉंग लाईक स्टील.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'टायगर नेहमी तयार असतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जखमी टायगर पेक्षा खतरनाक काहीही नसतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जगाचा इतका विचार करू नकोस स्वत: वर लक्ष दे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लय भारी वाटलं राव! पदरेशात भारतीय चाहत्यांना भेटून Prasad Oak भारावला

सलमाननं असे हॅशटॅग वापरण्याचं कारण म्हणजे तो सध्या टायगर 3 चं चित्रीकरण करत आहे. त्यानंतर सलमानच्या या चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन होईल या सगळ्याला खूप वेळ जाणार आणि अखेर चित्रपट प्रदर्शित होणार. काही दिवसांपूर्वी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर निर्मात्यांची जितकी अपेक्षा केली होती तितकी काही चांगली कमाई केली नाही. चित्रपटात सलमाननं शहनाज, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम यांनी भूमिका साकारल्या होत्या, तर सलमाननं त्यांना संधी दिली होती.