दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
दीपिका-रणवीर लवकरच विवाह बंधनात
मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. पण आता लग्नाचा मुहूर्त ठरल्याचं समजतं आहे. येत्या ११ नोव्हेंबरला बॉलिवूडच्या या सर्वाधिक चर्चेतल्या जोडीने शुभमंगल करण्याचं ठरवल्याचं सांगण्यात येतं आहे. याबाबत या दोघांनीही फारसं स्पष्टपणे बोलण्यास सध्यातरी उत्सुकता दाखवली नसली. तरी दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. दोघांच्याही घरी सध्या लग्नीघाई पाहायला मिळतेय. लग्नाचं ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र इटलीमध्ये किंवा बंगळुरूमध्ये लग्नाचा जंगी सोहळा पार पडणार आहे. तर मुंबईमध्ये मित्रपरिवारासाठी एक ग्रॅण्ड रिसेप्शन देण्यात येणार आहे.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका आणि बाजीराव रणवीर सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगतायत. या शाही विवाह सोहळ्यासाठी दीपिका तब्बल 5 कोटींचा लेहेंगा परिधान करणार असल्याचं म्हंटलं जातयं..दीपिकाच्या ज्वेलरीपासून ते आऊटफिट पर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा सातत्याने रंगते आहे. दीपिकाने आपल्या लग्नासाठी आतापासूनच फेमस फॅशन डिझायनर सब्यसाचीला सुंदर लेहंगा बनवण्याची ऑर्डर दिलीये..दीपिकाचा सब्यसाचीवर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच तिने यासाठी त्याची निवड केलीये. सब्यसाचीने डिझाईन केलेल्या साड्याच दीपिका नेहमीच वापरते..
लग्नासाठीचा दीपिकाचा हा लेहंगा जवळपास 26 जण मिळून तयार करणार आहेत. याहीपेक्षा खास गोष्ट म्हणजे दीपिकाचा लेहेंगा 5 कोटींचा असणार आहे. ऐकून धक्का बसला ना तुम्हाला तर दीपिकाचा हा लग्नसोहळा ख-या अर्थाने शाही असणार आहे.