Deepika Padukon - दीपिका पदुकोण, बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री. आपल्या सिनेमांमुळे आणि मध्यंतरी घडलेल्या काही कॉंट्रोव्हर्सीमुळे कायम चर्चेत असणारं नाव. नुकतीच दीपिका पदुकोण हिला रुग्णालयात दाखल करायची वेळ आलेली. तब्येत बिघडल्याने दीपिकाला रुग्णालयात दाखल करावं लागलेलं. दीपिकाचा हार्ट रेट वाढल्यामुळे, तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली. रुग्णालयात दीपिकाच्या अनेक टेस्ट केल्या गेल्या. काही वेळाने दीपिकाला घरी पाठवण्यात आलं. सध्या दीपिकाची प्रकृती चांगली आहे. मात्र दीपिकाला नेमकं झालेलं काय? तिचा हार्ट रेट अचानक का वाढला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार दीपिकाला हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं बोललं जातं. नुकतीच दीपिकाला ज्यामुळे रुग्णालय गाठायची वेळ आलेली तो आजार Heart Arrhythmia च्या लक्षणांमुळे झाला होता. दीपिकाला असं पहिल्यांदाच रुग्णालयात जावं लागलेलं नाही. याआधीही तिला असं रुग्णालयात जावं लागलेलं. अशात नक्की दीपिकाला झालेला हा आजार कोणता जाणून घेऊया 


हार्ट एरिथमीया (Heart Arrhythmia) म्हणजे काय?


सोप्या भाषेत जाणून घेऊयात दीपिका पदुकोणला झालेल्या आजाराबाबत. मानवी हृदय हे विशिष्ट लयीत आणि वेगाने धडकतं. ही लय बिघडली तर त्याला हार्ट एरिथमीया (Heart Arrhythmia) म्हणतात.  


हेही वाचा : बाबो ! तरुणींनी एकमेकांसोबत हे काय केलं? थेट कपडे फाटेपर्यंत... व्हिडीओ व्हायरल


हार्ट एरिथमीया (Heart Arrhythmia) पासून कोणता धोका? 


सर्वसाधारणपणे हार्ट एरिथमीयाने नुकसान होत नाही. मात्र, जर यामुळे तुमच्या शरीराच्या महत्त्वाच्या भागांमध्ये ( मेंदू, फुफुसं किंवा इतर अवयव) जाणारा रक्तपुरवठा प्रभावित झाला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यावेळी हा आजार तुमच्या आरोग्यसाठी घातक ठरू शकतो. 


हार्ट एरिथमीया (Heart Arrhythmia Symptoms) ची लक्षणे काय?


  • हृदयाचे ठोके चुकणे 

  • मान किंवा छातीत फडफड

  • हार्ट रेट अचानक वाढणं किंवा कमी होणं 

  • छातीत दुखणं 

  • श्वास घेण्यास त्रास होणं 

  • भुरळ येणं किंवा थकवा 

  • प्रचंड घाम येणं 

  • हार्ट एरिथमीया (Heart Arrhythmia Symptoms)


हेही वाचा - अशा बोटांच्या स्त्रिया पतीचं भाग्य उजळवतात... 


हार्ट एरिथमीयाची कारणे काय? (Heart Arrhythmia Cause)


हार्ट एरिथमीया आजाराची अनेक कारणं असू शकतात. यामध्ये हाय ब्लड प्रेशर, तणाव, डिप्रेशन ते टेन्शन किंवा अगदी कोणती ऍलर्जी हे देखील असू शकतं.