मुंबई : बॉलिवूडचा बाजीराव आणि मस्तानी आता नेहमीसाठी एकत्र झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी विवाह केला. ६ वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यातच आता आणखी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे दीपिका प्रेग्नेंट असल्याची. १४ आणि १५ नोव्हेंबरला दोघांचा विवाह झाला होता. एका मुलाखतीत दीपिकाला प्रेग्नेंसी बाबत जेव्हा विचारण्यात आलं की, समाजात पसरलेल्या स्टीरियोटाइप्सला ती कशी हँडल करणार आहे? यावर उत्तर देतांना दीपिकाने म्हटलं की, 'मला वाटतं की यात काहीही हँडल करण्यासारखं नाही आहे. जेव्हा आम्ही तुमच्या सगळ्य़ाच्या नजरेसमोर असतो. तेव्हा आमच्यासंबधित अफवा तर पसरतातच.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने पुढे म्हटलं की, 'कधी-कधी लोकं आधीच काही गोष्टींचा अंदाज बांधतात. पण कधी ते बरोबर ठरतं तर कधी चुकीचं. त्यामुळे मला असं वाटतं की, या गोष्टीशी डील करण्यात काहीच फायदा नसतो. हे जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल.'


दीपिकाने अशा प्रकारे प्रेग्नेंसीच्य़ा चर्चांचा पूर्णविराम दिला. काही दिवसांपूर्वी हे कपल हनीमूनला गेले नाही म्हणून देखील चर्चता रंगली होती. दीपिकाने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता की, रणवीरसोबत तिची एंगेजमेंट ४ वर्षापूर्वीच झाली होती. १४ आणि १५ नोव्हेंबरला त्यांनी इटलीच्या लेक कोमो येथील विला डेल बालबियानेलोमध्ये विवाह केला होता. दीपवीरने कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं होतं. दीपिका लवकरच अॅसिड अटॅक विक्टिम लक्ष्मीच्या बायोपिक सिनेमा छपाकमध्ये झळकणार आहे. मेघना गुलजार यांचा हा सिनेमा आहे.