मुंबई : बॉलिवूडची दिवा दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या कथित प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतानाच दोघांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ग्रँड स्लॅम विजेता टेनिसस्टार नोवाक जोकोविचची एक्स गर्लफ्रेण्ड पॉप स्टार नताशाने दीपिकाने जोकोविचसोबत डेटिंग केल्याचा दावा केलाय. त्यामुळे नक्कीच दीपिका बरोबरचं रणवीरचे फॅन्सही नाराज झाले असतील यात शंका नाही.


दीपिकाने खरचं रणवीरला चीट केलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च २०१६ मध्ये दिपिका आणि नोवाक लॉस एन्जेलिसमध्ये डेटवर गेल्याचा फोटो व्हायरल होतोय. तेव्हा हा फोटो बघून सगळ्यांना वाटत होतं की ही दोन सेलिब्रिटींमधील ग्रेट भेट आहे. त्यावेळी इंटरनॅशनल मीडियाने दीपिकाला ओळखलं नव्हतं या गोष्टीचीच जास्त चर्चा  झाली होती. त्यामुळे दीपिकाचे फॅन्स नाराज झाले होते. पण आता जी बातमी समोर आलीये त्याने सगळ्यांनाचं धक्का बसलाय.


नोवाकची  एक्स गर्लफ्रेण्ड आणि पॉप स्टार नताशाने एका मुलाखती दरम्यान दावा केलाय की 'नोवाक दीपिकाला डेट करुन सगळ्यात जास्त आनंदी असेल'... नताशाच्या या स्टेटमेन्टमुळे या दोघांच्या संबंधाबाबतीत अनेक चर्चांना उधाण आलंय.


गेल्या दीड वर्षांपासून नोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा मीडियामध्ये रंगतायत. त्यातच दिग्गज टेनिसपटू जॉन मॅकएन्रो यांनी जोकोविचची तुलना थेट अनेक अफेअर्सची परंपरा असलेले गोल्फपटू टायगर वुड्स यांच्याशी केली होती. त्यामुळे या प्रकरणाला आणखी हवा मिळाली होती. भरीस भर म्हणजे जोकोविचच्या कोणे एके काळच्या गर्लफ्रेण्डने त्याचं नाव दीपिकासोबत जोडलं आहे. त्यामुळे या चर्चां आता जरा जास्तचं रंगू लागल्या आहेत.


नोवाक आणि दीपिका 

'ट्रीपल एक्स द रिटर्न ऑफ द झेंडर केज'च्या शूटच्या दरम्यान नोवाक आणि दीपिकामध्ये जवळीक निर्माण झाली? यामुळेचं रणवीर आणि दीपिकामध्ये दुरावा आला? दीपिका अजूनही नोवाकला डेट करते का? अशा असंख्य प्रश्नांचा काहूर दीपिकाच्या फॅन्सच्या मनात आता माजला आहे. 


यापूर्वीही दीपिकाचं नाव क्रिकेटपटू युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, रणबीर कपूर, सिद्धार्थ माल्या अशा अनेकांसोबत जोडलं गेलं. सिध्दार्थ माल्या बरोबर तर दीपिकाला बऱ्याचदा आयपीएलच्या मॅचेस दरम्यान बघितलं होतं. युवराज आणि धोनीच्या मैत्रीत दीपिकामुळेचं फूट पडल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती तर रणबीर आणि दीपिकाचं अफेअर जगजाहिर होतं. पण  यापैंकी कोणासोबतचंही अफेअर दीपिकाने कधीही जाहिर केलं नाही.


सध्या बॉलिवूडचा 'बेफिक्रा' रणवीरसिंगसोबत दीपिका रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे... पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये तणावाच्या चर्चा रंगतायत.


आता रणवीर बरोबर तणावाचं कारण जोकोविच तर नाही ना? असा प्रश्न दीपिकाच्या फॅन्सला पडला आहे. वेल आता या सगळ्या प्रकरणावर दीपिका काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.