मुंबई : बॉलिवूडमधील लग्नसराई काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. दीपिका-रणवीर हे जोडी लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे कळतेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडेच दीपिकाच्या आई-वडीलांनी मुंबईत येऊन रणवीरच्या आई-वडीलांची भेट घेतली. या बैठकीत त्यांच्या लग्नाची तारिख ठरवण्यात आल्याचे समजतेय. पुढील ३-४ महिन्यात ही जोडी विवाहबद्ध होईल, अशी चर्चा आहे.


येथे होणार लग्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीनंतर दोन्हीही कुटुंब वरळी येथील एका पंचतारांकीत हॉटेलात जेवायला गेले होते. दीपिका-रणवीरला डेस्टिनेशन वेडींगची क्रेझ होती. पण आई-वडीलांच्या इच्छेखातर हे लग्न मुंबईत पार पडेल. कारण रणवीरचे अनेक नातेवाईक दिल्ली, मुंबईतच राहतात. त्यामुळे मुंबईतील एका आलिशान ठिकाणी हे लग्न दाक्षिणात्य परंपरेनुसार होईल. त्यानंतर मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही कळतेय.


चाहत्यांना सुखद धक्का


खूप काळापासून दीपवीरच्या प्रेमाच्या चर्चा सुरू आहेत. पण दोघांनीही हे नाते उघडपणे मान्य केलेले नाही. पण आता लवकरच विवाहबद्ध होऊन दोघेही त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का देणार असल्याचे सुत्रांकडून कळतेय.