दीपिकानं दिला मुलाला जन्म? बाळाला हातात घेतलेला रणवीर सिंगचा PHOTO VIRAL
Did Deepika Padukone Gave Birth to Baby Boy : दीपिका पदुकोणनं दिला मुलाला जन्म!
Did Deepika Padukone Gave Birth to Baby Boy : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे सप्टेंबर महिन्यात आई-वडिल होणार आहेत. फेब्रुवारीत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. तेव्हा पासून दीपिकाच्या बेबी बंपवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काहींनी खरंच ती प्रेग्नंट आहे की नाही असं म्हटलं तर अनेकांनी सरोगसीच्या माध्यमातून आई होणार असल्याचा दावा केला. आता दीपिकाचा रुग्णालयातून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात रणवीर सिंगच्या हातात बाळ असल्याचं दिसतंय. मात्र, त्या मागचं सत्य काय आहे हे जाणून घेऊया...
काल 2 ऑगस्ट रोजी 'आजतक'नं सांगितलं की दीपिका आणि रणवीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी दावा करण्यात आला आहे की दीपिकानं एका मुलाला जन्म दिला आहे. फोटोत दीपिका रुग्णालयात असल्याचे दिसत आहेत. तर रणवीरनं बाळाला हातात धरलं असून कॅमेऱ्याच्या दिशेनं बाळाचा चेहरा केला आहे. व्हिडीओत तो त्या बाळाचे लाड करताना दिसत आहे.
खरंतर हा फोटो मॉर्फ्ड आहे. दीपिका पदुकोणची डिलीव्हरी सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो फेक आहे. अनेकदा दीपिकानं तिचं बेबी बंप हे पब्लिक प्लेसवर फ्लॉन्ट केलं आहे. 'कल्कि 2898 AD' च्या प्रमोशनल कार्यक्रमात दीपिकानं काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. त्यात दीपिकाचं बेबी बंप दिसत होतं. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि प्रभास तिच्या मदतीसाठी धावून आल्याचे दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता.
इतकंच नाही तर प्रेग्नंसी दरम्यान, दीपिकानं 'सिंघम अगेन' ची शूटिंग देखील केली होती. रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या सेटवरून दीपिकाचा पोलिस अधिकाऱ्याच्या लूक व्हायरल झाला होता. त्यात पोलिसांचा गणवेश आणि चष्मा लावून लेडी सिंघमच्या लूकमध्ये दीपिका दिसत होती. तिचा फोटो पाहून तिचं कामाच्या प्रती असलेलं डेडिकेशन पाहून अनेकांची तिची स्तुती केली होती. दरम्यान, अजूनही काही लोक आहेत जे दीपिकाच्या बेबी बंपला फेक असल्याचं बोलत आहेत. तिला ट्रोल करत आहेत.