मैत्रिणीच्या लग्नाची धावपळ दीपिकाला पडली महाग
शेअर केला फोटो
मुंबई : दीपिका पदुकोणची तब्बेत बिघडली आहे. मैत्रिणीच्या लग्नाची धम्माल बंगलुरूत करून आल्यानंतर दीपिकाची तब्बेत बिघडली आहे. अस्वस्थ वाटत असताना दीपिकाने चाहत्यांसाठी हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
दीपिका या फोटोत अगदी थकलेली दिसत आहे. फोटोसोबत तिने कॅप्शन देखील लिहिली आहे. 'जेव्हा तुम्ही खास मैत्रिणीच्या लग्नात खूप मजा करता' असं कॅप्शन दीपिकाने शेअर केली आहे.
दीपिका तिची खास मैत्री उर्वशी केशवानी हीच्या लग्नाला बहिण अनिशा पदुकोण उपस्थित होती. यावेळी अनिशाने लाल आणि सोनेरी रंगाचा अनारकली सुट तर दीपिका पदुकोणने सोनेरी रंगाची साडी नेसली असून चोकर घातला आहे.
दीपिका या लग्नाला उपस्थित होती याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. दीपिकाचा हा लूक तिच्या बंगलुरू रिसेप्शनची आठवण करून देणारा आहे. चाहत्यांना यावेळी दीपिका आणि रणवीर सिंहच्या रिसेप्शनची आठवण झाली.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती, अभिनेता रणवीर सिंग यांनी नुकतीच बंगळुरू येथील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. उर्वशी केशवानी हिच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी म्हणून दीपिका आणि रणवीरने त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला होता. लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांपासून ते अगदी मुख्य सोहळ्यापर्यंतचे अनेक फोटो आणि व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले.
फक्त दीपिकाच नव्हे, तर तिचे कुटुंबीयसुद्धा या सोहळ्यात अनेकांचं लक्ष वेधून गेले. दीपिका, तिची बहीण अनिशा आणि आई यांचा पेहराव यावेळी विशेष आकर्णाचा विषय ठरला. स्टायिश पण, तितकाच पारंपरिक बाज या तिघींच्याही पेहरावात पाहायला मिळाला होता.