मुंबई : ऑस्कर पुरस्कार हा कोणत्याही चित्रपटासाठी आणि कलाकारांसाठी सगळ्यात खास असतो. प्रत्येक कलाकार आपल्या श्रेणीपर्यंत पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतो. पुन्हा एकदा या अवॉर्ड शोची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी यावेळी हा पुरस्कार सोहळा खूप खास होता कारण तिला टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्याची माहिची  स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिकाने लिहिलं की, 'मला वाटतं सोमवारच्या सकाळची  सुरुवात ही चांगली झाली आहे.


हा पुरस्कार अशा निवडक लोकांना प्रदान करण्यात आला आहे जे आपल्या ओळखीचा वापर करून चांगलं भविष्य घडवत आहेत. यापैकी एक नाव दीपिका पदुकोणचं देखील आहे. जिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात खूप काम केलं आहे.


2015 पासून मानसिक आरोग्य क्षेत्रात करत आहे काम 
दीपिका स्वतः डिप्रेशनची शिकार झाली होती. त्यानंतर तिने मेंटल हेल्थ फाउंडेशन सुरू केलं. दीपिकाने स्वतः सांगितलं होतं की, 'मी 2014 साली डिप्रेशनची शिकार झाले होते आणि त्यानंतर मी मानसिक आरोग्य फाउंडेशनची स्थापना केली'. या दिशेने काम करण्यासोबतच दीपिका मानसिक आरोग्याबाबतही मोकळेपणाने बोलत असते. ऑस्कर पुरस्कार 2022 बद्दल बोलायचं झालं तर, बऱ्याच काळापासून, कोरोना विषाणूमुळे, जगभरातील पुरस्कार शो आणि कार्यक्रमांच्या तारखा पुढे ढकलल्या जात होत्या.



अशा परिस्थितीत, मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेरीस 94 व्या अकादमी पुरस्काराचे आयोजन रविवार, 27 मार्च 2022 रोजी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे आयोजन एमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा साइक्स ने की. जेसन मोमोआ, सेरेना विलियम्स, वीनस विलियम्स, जोश ब्रोलिन, जॅकब एलोर्डी, जॅक गिलेनहाल, जिल स्कॉट, जे.के. सीमन्स आणि राहेल ज़ेग्लर पुरस्कार देण्यासाठी पोहोचले. 'किंग रिचर्ड' चित्रपटासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला.