Deepika Padukone : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादुकोन (deepika padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण मुलाखतींच्या माध्यमातून दोघांनी विभक्त होण्याच्या चर्चा फक्त अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री छोट्या चाहत्यासोबत दिसत आहे. (deepika padukone and ranveer singh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये दीपिका चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे (ranveer and deepika), शिवाय दीपिकाने त्याला प्रेमात किस देखील केलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या व्हिडीओची चर्चा आहे. व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. शिवाय अनेकांनी लाईक करत व्हिडीओवर कमेंट देखील केली आहे.  पाहा व्हिडीओ.... 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं जोडपं आहे. रणवीर आणि दीपिका यांनी 2013 मध्ये रीलिज झालेल्या रामलीला सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. सहा वर्षे डेट केल्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. (deepika ranveer wedding)


दोघांचे चाहते जोडप्याला 'दीपवीर' नावानं संबोधतात. असं असताना गेल्या काही दिवसात या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. यावर दीपिका आणि रणवीरनं आपल्या शैलीत उत्तर देत अफवा असल्याचं दाखवून दिलं आहे. (deepika padukone husband name)


काही दिवसांपूर्वी दीपिकाची तब्येत बिघडल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात होते. तिची तब्येत बिघडल्याच्या बातम्यांदरम्यान, सोशल मीडियावर नात्यात दुरावा निर्माण झाल्याची अफवा पसरली होती. (deepika padukone news)