मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात गोड आणि हॉट कपलपैंकी एक आहेत. सोशल मीडियावर असो किंवा इव्हेंटमध्ये, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एकत्र परफेक्ट पोझ देण्यात कधीच मागे पडत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंग नेहमीच एनर्जीने भरलेला असतो. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुमचा विश्वास बसणार नाही की, रणवीर जेव्हाही त्याची पत्नी दीपिका पदुकोणच्या आसपास असतो तेव्हा असं घडत नाही. याचा खुलासा स्वतः दीपिकाने फिल्मफेअरला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत केला होता.


दीपिकाने रणवीरशी संबंधित उघड केलं रहस्य 
जेव्हा दीपिका पदुकोणला विचारण्यात आलं की, ' जर तुम्ही आणि रणवीर सिंग खूप वेगळे आहात तर एकत्र कसे मॅनेज करतात?' यावर उत्तर देत दीपिका पदुकोणने खुलासा केला की, 'ज्यावेळी रणवीर माझ्यासोबत असतो तेव्हा तो शवासन मोडमध्ये असतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. 


यानंतर याशिवाय दीपिकाने पुढे खुलासा केला की, 'आम्ही एकमेकांसोबत विनोद करतो, एकमेकांसोबत खेळतो, एकत्र खातो'. कधी कधी आपल्यात फक्त शांत असतो. अनेकांना माहीत नसलेला किंवा अनेकदा समोर न येणारा पैलू आणि तो म्हणजे त्याचा 'शहाणपणा'.


दीपिका पदुकोणने मुलाखतीत पुढे सांगितलं की, रणवीर सिंग खूप हुशार आणि खूप क्रिएटिव्ह देखील आहे. आपल्या पतीचं कौतुक करत दीपिकाने रणवीरला त्याच्या करिअरमध्ये काय हवं आहे याबद्दल सांगितलं. त्याला कोणत्या प्रकारचे सिनेमे करायचे आहेत याबाबत तो स्पष्ट आहे. त्याला कोणत्या प्रकारचे सुपरस्टारडम मिळवायचं आहे? यासाठी त्याला कोणत्या कामाची गरज आहे? हे सगळे गोल्स त्याचे सेट आहेत.


रणवीरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच आलिया भट्टसोबत 'रॉकी और रानी की प्रेमकथा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय दीपिका 'पठाण' आणि 'फायटर' सारख्या मोठ्या चित्रपटात दिसणार आहे.