मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंग याच्याशी लग्नगाठ बांधली. दोन्ही कलाकारांच्या रुढीपरंपरांना अनुसरून हा विवाहसोहळा पार पडला. 2012 पासून सुरु झालेल्या त्यांच्या नात्याला या क्षणापासून एक नवं नाव मिळालं. (Deepika Padukone Ranveer Singh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि दीपिका हा प्रवास सर्वांना हेवा वाटेल असाच होता आणि आहे. पण, तुम्हाला माहितीये का बऱ्याच वर्षांपूर्वी दीपिकाचा साखरपुडा झाला होता. 


आता तुम्ही म्हणाल रणवीरशी लग्न आणि साखरपुडा कोणाशी? तर, तसं नाहीये. दीपिकानं रणवीरशीच साखरपुडा केला होता. तोसुद्धा त्यांच्या रिलेशनशिपची दोन वर्ष पूर्ण झाल्यावर. 


फक्त काही ठराविक कुटुंबियांनाच याची कल्पना होती. 


एका नामांकित मासिकाला दिलेल्या मुलाखतीत खुद्द दीपिकानंच याचा खुलासा केला होता. 


'मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा असं आढळतं की, अवघ्या सहा महिन्यांमध्येच मी त्या नात्यात भावनिकरित्या गुंतले होते. 


त्यानंतर आम्ही लग्न केव्हा करणार हाच प्रश्न. मला त्याच्याबाबत कधीच साशंकता नव्हती.'


आम्ही लढलो... 
'अर्थातच एका सहा वर्षांच्या नात्यात तुम्ही अनेक चढ- उतारांतून जाता. आम्हीही गेलो पण हात टेकले नाहीत. 


आता थांबू आणि यावर विचार करु अशी वेळ आमच्यावर केव्हाच आली नाही. आम्ही परिस्थितीशी लढलो, चढ- उतारही पाहिले. 


नात्यात दोन वर्षांनंतर आम्ही साखरपुडाही केला, कोणालाही याची कल्पना दिली नाही. फक्त त्याचे आणि माझे आईवडील आणि दोघांच्याही बहिणींना याची कल्पना होती', असं दीपिका म्हणाली. 


दीपिका आणि रणवीरनं कायमच एकमेकांना आपआपल्या क्षेत्रातही पाठिंबा दिला आहे. एक स्टार कपल म्हणून या जोडीकडे याच निकषांवर पाहिलं जातं हीच बाब सर्वकाही सांगून जाते.