मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या कामा व्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता देखील ती एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. दीपिकाने पती आणि अभिनेता रणवीर सिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. दीपिकाने पोस्ट केलेल्या फोटोपेक्षा फोटोवर आलेल्या कमेन्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने रणवीरचा फोटो पोस्ट करत कमेन्टमध्ये 'माझ्या सकाळचा नजारा' असं लिहिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दीपिकाने रणवीरचा फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या दीपिकाने पोस्ट केलेला रणवीरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



फोटोमध्ये रणवींरने त्याचे डोळे स्वेटशर्टने झाकले आहेत. अभिनेत्याचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना फार आवडला आहे. दीपिकाने रणवीरचा फोटो शेअर करताचं काही तासांतचं 10 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. फोटोवर रणवीरने देखील कमेन्ट केली, तो म्हणाला, 'बेबी... क्या यार...' रणवीरच्या या कमेन्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.