VIDEO : `फायटर`च्या प्रदर्शनाआधी तिरुपती बालाजी दर्शनाला पोहोचली दीपिका पदुकोण, JNU प्रकरणाचा इफेक्ट?
Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं संपूर्ण कुटुंबासोबत घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतायच सोशल मीडियावर व्हायरल
Deepika Padukone : बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या एरियल अॅक्शन थ्रिलर 'फायटर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये हृतिक रोशन, दीपिका आणि अनिल कपूर दिसले. तर दुसरीकडे हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला. टीझर पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. दीपिकाचा हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ती तिच्या बहिणीसोबत प्रभू वेंकटेश्वर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली.
सोशल मीडियावर दीपिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की दीपिका गुरुवारी रात्री प्रभू वेंकटेश्वरचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिची बहीण अनीशा आणि तिची संपूर्ण टीम यावेळी दिसली. ते तिरुमालाला गेल्याचे पाहायला मिळते. यावेळी दीपिकानं काळ्या रंगाचं को-ऑर्ड सेट परिधान केला होता. तर केसांचा मेसी बन केल्याचे पाहायला मिळते. काल दीपिकानं दोन तासाची चढाई करत मंदिर परिसरात आली आणि तिथे एका गेस्ट हाऊसमध्ये थांबली होती. तर आज सकाळी तिनं संपूर्ण कुटुंबासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
यानंतर दीपिकाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तिनं यावेळी वेंकटेश मंदिर म्हणजेच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्याचे पाहायला मिळते. या व्हिडीओत पारंपरिक वेषात दिसत असलेली दीपिका तिच्या संपूर्ण कूटुंबासोबत दिसत आहे. वेंकटेश्वर मंदिराविषयी बोलायचे झाले तर विष्णु देवाच्या वेंकटेश्वर रुपाची इथे पूजा करण्यात येते. असं म्हटलं जातं की कलियुगातील सगळ्या संकटांना दूर करण्यासाठी पृथ्वीवर अवतरित झाले होते. हेच कारण आहे की या पवित्र स्थानला कलियुगातील वैकुंठ असं नाव देण्यात आलं आहे.
खरंच आहे का JNU इफेक्ट?
'छपाक' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाच्या जेएनयू भेटीवर वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं की उत्तर हे स्पष्ट आहे की 'त्यावेळी दीपिकाचं JNU जाणं चित्रपटासाठी योग्य ठरलं नाही. कारण जो विषय मला सगळ्यांसमोर आणायचा होता तो विषयी म्हणजेच अॅसिड अटॅक मागे राहतं, दुसऱ्याच विषयाकडे सगळ्यांचं लक्ष वळलं. त्यामुळे, त्या सगळ्याचा चित्रपटावर परिणाम झाला. याच कारणामुळे या गोष्टीला चुकीचं ठरवू शकत नाही.' दरम्यान, नक्की दीपिकानं याच कारणामुळे तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले असं म्हणता येणार नाही.
हेही वाचा : 'लेकीलाच ठाऊक नाही बापाचा पुरस्कार'; KBC मध्ये सुहानाला देता आलं नाही SRK बद्दलच्या 'या' प्रश्नाचं उत्तर
दीपिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'फायटर' हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्याशिवाय करण सिंग ग्रोवर दिसणार आहे. करण सिंग ग्रोवर हा एका स्क्वॉड्रम लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर हे कमांडिग ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर याशिवाय दीपिका 'कल्कि 2898 AD' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे.