जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.
Deepika Padukone and Ranveer Singh Net Worth : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone and Ranveer Singh) आई-बाबा झालेत...गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. जन्माला येताचं दीपीका रणवीरचं बाळ जन्माला येताच 775 कोटींची मालक बनलं आहे. दीपीकाची संपत्ती ही रणवीरची संपत्तीच्या दुप्पट आहे.
शुक्रवारी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शनदेखील घेतले होते. Viral bhayani या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आलं होतं. आणि आज तिची प्रसुती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपीका रणवीर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
2018 मध्ये दीपिका-रणवीर यांनी इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. जवळचे मित्र-मैत्रिण व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा हा शाही लग्न सोहळा पार पडला होता. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरुत त्यांनी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.
फेब्रुवारी महिन्यात दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आई वडिल होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. गेल्या आठवड्यातच दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट केले होते. मॅटरनिटीच्या बोल्ड फोटोशूटमुळे दीपीकाला ट्रोल देखील करण्यात आले.
दीपिका रणवीरपेक्षा दुप्पट श्रीमंत
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे टॉप स्टार आहेत. चित्रपट आणि जाहिरातींसाठी ते कोट्यावधीचे मानधन घेतात. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, रणवीर कपूरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमधील टॉप आणि महागडी अभिनेत्रीअशी दीपीकाची ओळख आहे. दीपिकाची एका महिन्याची कमाई 3 कोटींपेक्षा जास्त आहे. दीपिकाने अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि फॅशन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे.
बॉलिवूडमधील श्रीमंत स्टार्स म्हणून ते ओळखले जातात. कमाईच्या बाबतीत दीपिका आणि रणवीर एकमेकांना टक्कर देतात. या दोघांची संयुक्त संपत्ती 745 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जन्माला येताचं दीपीकाची मुलगी 775 कोटींची मालकिण बनली आहे.