मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण फिटनेस फ्रिक असल्याचे आपण सर्वच जाणतो. त्यासाठी जिम, डान्स असे अनेक प्रकार ती करत असते. पण सोशल मीडियावर ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी अपडेट्स देते. पण काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र त्याचदरम्यान दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो तुम्हाला काहीसा चकीत करेल. या फोटोत ती तिच्या फिटनेस ट्रेनर सोबत दिसत आहे. पण सर्व लक्ष तिच्या पाठीवर टॅटू वेधून घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर आणि दीपिका रिलेशनमध्ये असताना तिने गोंदवलेला आरके चा टॅटू खूप जूना आहे. तो टॅटू तिने रिमूव्ह केल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. मात्र आरके चं भूत तिच्या मानगुटीवर कायम असल्याचे या फोटोतून दिसत आहे.




रणबीर-दीपिकाचे बेक्रअप झाल्यानंतर रणवीर सिंग सोबत तिची जवळीक वाढली. त्यानंतर त्याच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले होते. सध्या मात्र त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र त्याचदरम्यान समोर आलेला हा फोटो आणि दीपिका-रणबीरने फॅशन शो मध्ये केलेला रॅम्पवॉक यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.