मुंबई : 'छपाक' Chhapaak सिनेमात मालतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणचा Deepika Padukone जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाणाऱ्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. सरकारकडून दीपिकाचे Skill India Promo संबंधित असलेले सर्व व्हिडिओ थांबवण्यात आले आहेत. सरकारविरोधी पाऊल उचलल्यामुळे दीपिकासोबत असं घडलं का? असा सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय Skill Development Ministry कडून दीपिकाचे प्रमोशनल व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या व्हिडिओत दीपिका ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांबद्दल आणि कौशल्य विकासाबद्दल माहिती देणार होती. या व्हिडिओत काही ऍसिड पीडित तरूणींचा देखील समावेश होता.  


कौशल्य विकासाचा हा व्हिडिओ दीपिकाच्या हस्ते बुधवारी प्रदर्शित करण्यात येणार होता. श्रम शक्ती भवनामार्फत हा व्हिडिओ दाखवण्यात येणार होता. मात्र मंगळवारी दीपिकाचा हा व्हिडिओ थांबवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 


45 सेकंदाच्या या व्हिडिओत दीपिका शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या 'छपाक' सिनेमाच्या विषयाबद्दल आणि इतर भारत कौशल्य विकासाबद्दल होलणार होती. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,'दीपिकाने ऍसिड पीडित तरूणींवर झालेल्या हल्ल्यावर आधारित सिनेमा छपाकमध्ये काम करत आहे. याकरता ती पीडित तरूणींना आणि दिव्यांग व्यक्तींना भेटली होती. या सगळ्यांना स्किल इंडियातर्फे मदत देण्यात आली होती.'


JNU च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं दीपिकाला चांगलच महागात पडलं आहे. दीपिकाच्या "छपाक' सिनेमावरही काहींनी बहिष्कार घातला आहे. तर दीपिकाच्या विरोधात अनेक वक्तव्य केली जात आहेत. या अगोदर स्किल इंडियामार्फत वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या 'सुई-धागा' या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं होतं. या सिनेमाच्या प्रमोशनच्या माध्यमातून भारतातील कौशल्य विकास दाखवण्यात आला होता.