एका दिवसात 55 कोटी कमवूनही पठाणला मात देऊ शकला नाही तारा सिंग! जाणून घ्या आतापर्यंतची कमाई
गदर २ चित्रपटगृहात दाखल झाल्यापासून हा चित्रपट दररोज चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून या पाच दिवसांत सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
मुंबई : नुकताच 'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करेल असं म्हटलं जातय. 'गदर 2' हा सिनेमा शाहरुखच्या पठाण सिनेमाला कमाईच्या बाबतीत मागे टाकू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणशी 'गदर 2' ची तुलना केली जात आहे. चित्रपटाची जबरदस्त कमाई लक्षात घेता. 'गदर 2' ने आत्तापर्यंत पाच दिवसांत 226 कोटींची कमाई केली आहे.
'गदर 2' रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत बक्कळ कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा पठाणलाही मागे सोडेल असं म्हटलं जातंय. मात्र असं म्हटलं जात असलं तरिही पठाणने रिलीजच्या ५ दिवसांत 270 कोटींची कमाई केली होती. आणि आता दुसरीकडे 'गदर 2' ने पाच दिवसांत २२६ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे अद्यापतरी 'गदर 2'ने शाहरुखच्या पठाणला मागे काढलेलं नाही. पठाण आणि गदर 2 मध्ये अजूनही 44 कोटींचे अंतर आहे. अनेक व्यापार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की गदर 2 पठाणला मागे सोडू शकतो. हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणाराच आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की पठाण हा भारतीय सिनेमातील पहिला चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर केवळ पाच दिवसांत 270 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर सनी देओलचा चित्रपट २२६ कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कमाईबद्दल बोलायचं झालं तर अवघ्या पाच दिवसांत गदर 2 चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.1 कोटी, दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.7 कोटी, चौथ्या दिवशी 38.7 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर, चित्रपटाची जगभरातील कमाई 400 कोटींचा आकडा पार करण्याच्या तयारीत आहे.
गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा 2001 मध्ये आला होता. त्यानंतर आता 22 वर्षानंतर या सिनेमाच्या सिक्वेलने धमाका केलाय. फुल टू अॅक्शन अन् सनी भाईचा धमाका...जिथं पिच्चर संपतो, तिथूच सुरू होते, गदर टू ची कहाणी... पाकिस्तानमधून भारतात येताना जो बापाला रेल्वे इंजिनमध्ये कोळला भरू लागणारा जित्ते आता मोठा झालाय. त्याला लागलंय अॅक्टिंगचं वेड. पण भारत पाकिस्तानमध्ये खडाजंगी होते अन् असं काही होतं की... पुन्हा सिनेमात होते पाकिस्तानची एन्ट्री. हिंदुस्तान जिंदाबाद अन् तोच हॅडपम्प, पण यावेळा हॅडपम्प नाही तर सनीभाई वेगळंच काहीतरी उचलतो. जुन्या आठवणी ताज्या करणारा असा हा सिनेमा आहे.