Urvashi Rautela Income : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ (urvashi rautela photo and video) शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकवेळा तिच्या फॅशनमुळे उर्वशी चर्चेत असते. उर्वर्शी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी क्रिकेटपटू ऋषभ पंत तर कधी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांच्यासोबत देखील उर्वशीचं नाव जोडण्यात आलं. पण यावर कधीही उर्वशीने स्पष्टीकरण दिलं नाही. आज अनेक कारणांमुळे उर्वशी चर्चेत असते, पण सिनेमे मिळत नसूनही उर्वशी कोट्यमधींची माया कशी कमवते असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. (urvashi rautela love life)


वाचा : धक्कादायक! कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक


उर्वशी रौतेला आज फार कमी सिनेमांमध्ये दिसते. मात्र अभिनेत्री कायम चर्चेत राहते. उर्वशी सोशल मीडिया क्वीन आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. सोशल मीडियाशिवाय उर्वशी रौतेला एंडोर्समेंट आणि इव्हेंटमधून कोट्यवधींची मया कमवते. (urvashi rautela films and songs)


रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला एका गाण्यासाठी 30 ते 40 लाख रुपये आणि एका सिनेमासाठी 3 कोटी रुपये मानधन घेते. उर्वशी आता लवकरच दाक्षिणात्या सिनेमा 'द लेजेंड'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.