धक्कादायक! कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक

कॅन्सरवर मात तर केली, पण आता 'त्या' एका घटनेमुळे अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक    

Updated: Nov 3, 2022, 03:42 PM IST
धक्कादायक! कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक   title=

Aindrila Sharma on Ventilator: जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) ची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेत्रीला उपचारासाठी रुग्णालयात (aindrila sharma in hospital) दाखल करण्यात आलं आहे. अचानक तब्येत बिघाडल्यानंतर एंड्रिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्री प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे चाहते अभिनेत्रीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. (aindrila sharma fans)

व्हेंटिलेटरवर आहे अभिनेत्री
एंड्रिलाने एक नाही तर, दोनवेळा कॅन्सरवर मात केली. पण आता अचानक अभिनेत्रीची तब्येत पुन्हा खालावली आहे. TOI रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एंड्रिला स्ट्रोक आला असून अभिनेत्रीच्या डोक्यात ब्लड क्लॉट्स जमा झाले आहेत. 

वाचा | 'जर ती माझी...', Amitabh Bachchan यांच्या नातीबद्दल काय म्हणाला सिद्धांत चतुर्वेदी?

 

अभिनेत्रीचे चाहते नाराज
अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अभिनेत्रीची प्रकृती कळताच तिचे सर्व चाहते चिंता व्यक्त करत आहेत आणि अभिनेत्री लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. (Aindrila Sharma on Ventilator)

अभिनेत्रीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण 
एंड्रिला शर्माने नुकतेच दोन ओटीटी  प्रोजेक्टमध्ये काम केलं. 'झमुर' (Jhumur) टीव्ही मालिकेमधून एंड्रिलाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय शो केले.