मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील देवमाणूस या मालिकेतील ड्रामा प्रेक्षक सध्या चांगलेच इन्जॉय करतायेत. या मालिकेत सतत नवनवीन अभिनेत्रींची एन्ट्री होताना पाहायला मिळतेय. अनेक ग्लॅमरस चेहरे आतापर्यंत या मालिकेत पाहायला मिळाले..त्यानंतर आता डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगला तुरुंगात धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची एन्ट्री झालीये. त्यामुळे मालिकेला नवं वळण मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवी सिंगकडून कसे त्याचे गुन्हे कबूल करुन घ्यायचे आणि त्याला त्याची कशी कठोर शिक्षा मिळेल यासाठी आर्या एक जबाबदार वकील म्हणून सगळे प्रयत्न करतेय.डॅशिंग सरकारी वकील साकारणारी ही अभिनेत्री म्हणजेच सोनाली पाटील.कमी वेळातच तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 



सोनालीच्या सोशल मिडीयावर अकाऊंट नजर मारली, तर बऱ्याचदा ती एकापेक्षा एक असे हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.. नुकतेच तिने पावसाचा आनंद घेताने काही मान्सून स्पेशल फोटो पोस्ट केले आहेत.या फोटोमधील तिचा बबली अंदाज साऱ्याचंच लक्षवेधून घेतोयं.


देवमाणूस या मालिकेच्या आधी सोनालीने 'वैजू नं 1' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. देवमाणूस मालिकेच्या सेटवरुनही सोनालीने अभिनेता किरण गायकवाड आणि इतर सहकलाकारांसोबत धम्माल डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. चाहत्यांकडून या व्हिडीओंना प्रचंड पसंती मिळते.