``आई निरक्षर असल्यामुळे...`` आपल्या जन्मतारखेबद्दल अभिनेत्यानं सांगितला `तो` भावुक प्रसंग
Kiran Gaikwad News: `देवमाणूस` (Devmanus Actor) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेलच. सध्या त्याचा `चौक` हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी त्यानं या चित्रपटाच्या निमित्तानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यानं खुलासा केला आहे.
Kiran Gaikwad Interview: मराठी चित्रपट आणि मालिकांचे प्रेक्षक प्रचंड आहेत. दररोज न चुकता मालिका पाहणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. 'झी मराठी'वरील 'देवमाणूस' (Kiran Gaikwad Upcoming Film) ही मालिकाही प्रचंड गाजली होती. या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाडचाही फॅन हा मोठा आहे. आता नुकताच त्याचा 'चौक' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्याच्या या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना कोण उत्सुकता लागून राहिली आहे.
'देवमाणूस' या मालिकेचे दोन सिझन प्रसारित (Devmanus Actor) झाले होती. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. या मालिकेच्या दोन्ही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ही मालिका अल्पावधीच प्रचंड गाजली. या मालिकेनं जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा अनेकांना वाईट वाटले होते.
किरण गायकवाडचा 'चौक' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तेव्हा यानिमित्तानं किरण गायकवाड हा या चित्रपटाच्या प्रेमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानं नुकत्याच एका युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत आपल्या जन्मतारखेबद्दल एक खुलासा केला आहे. आजवर कदाचित त्यांच्या प्रेक्षकांना आणि चाहत्यांना याबद्दल माहितीही नसेल. 'देवमाणूस' या मालिकेच्या अगोदर किरणनं 'लागिर झालं जी' या मालिकेतून नकारात्मक भुमिका केली होती. त्याच्या या भुमिकेचेही प्रचंड कौतुक करण्यात आले होते. सोबतच त्याला या त्याच्या भुमिकेसाठी पुरस्कारही मिळाला होता.
हेही वाचा - नॅशनल क्रश स्मृती मंधाना करतेय बॉलिवूड गायिकेच्या भावाला डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण
किरणनं आपला चित्रपट 'चौक'च्या निमित्तानं आरपार या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली. यावेळी आपल्याला आपली जन्मतारिख माहिती नसल्याचा खुलासा त्यानं केला आहे. यात तो म्हणाला की, ''एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी माझी गोष्ट आहे. त्यामुळेच मी माझ्या इन्टाग्रामवरच्या बायोमध्येही 'कहानी पूरी फिल्मी' असं लिहिलं आहेय मला माझी जन्मतारिख माहिती नाही.''
हे स्पष्ट करत तो म्हणाला की, ''माझा जन्म घरी झाला आहे. घरात मुलगा झाला म्हणून बाबा एक-दोन आठवडे आनंदात आणि उत्साहात गेले होते. आई निरक्षर असल्यामुळे तिनंही कुठे नोंद केली नाही. शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मतारखेचा दाखला लागतो. त्यासाठी मी आणि आई ससून रूग्णालयात गेलो. तिथून मी जन्माचा दाखला आणला. त्यावर एक तारीख लिहावी लागते म्हणून 12 जून ही तारीख मी टाकली.
त्यामुळे माझं नक्षत्र, जन्मतारीख काय हे मला काहीच माहिती नाही'' असं तो म्हणाला. 2 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'चौक' या चित्रपटात संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, शुभांकर एकबोटे, उपेंद्र लिमये यांच्याही भुमिका आहेत.