मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही नवी मालिका लवकरच झी मराठी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने तो भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात मध्यवर्ती भूमिकेत लागीर झालं जी फेम भैय्यासाहेब म्हणजेच किरण गायकवाड असणार आहे.


देवमाणूस । प्रोमो १।

हा खरंच देवमाणूस ? नवी मालिका "देवमाणूस" ३१ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री १०:३० वा. #Devmanus #ZeeMarathi

Posted by zee marathi on Tuesday, August 11, 2020

समाजातील अपप्रवृत्तींविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मालिका सादर करण्यात येत असून मालिकेचे चित्रिकरण साताऱ्यात होत आहे. 31 ऑगस्टपासून रात्री १०.३० वा. वाजता झी मराठीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘



रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्याचप्रकारे ही नवी मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आम्हाला आशा आहे.