Devoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, `यापेक्षा तर राखी सावंत...`
Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे.
Devoleena Bhattacharjee Got Trolled : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली. देवोलीनाच्या मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत (Shanawaz Shaikh ) सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. मात्र, लग्नानंतर देवोलीनानं सोशल मीडियावर नवऱ्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
देवोलीनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देवोलीना आणि शहनवाज सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. त्या दोघांच्या समोर केक असून ते त्यांच्या लग्नाला एक महिना झाल्याचा आनंद सेलिब्रेट करत आहेत. हे फोटो शेअर करत 'आमच्यासाठी आनंदाचा आणि अविश्वसनीय असा एक महिना...', असे कॅप्शन देवोलीनानं दिलं आहे.
देवोलीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, अशी काय मजबुरी होती देवोलीना? दुसरा नेटकरी म्हणाला, तुझा नवरा जोकर दिसतो. तिसरा नेटकरी म्हणाला, यापेक्षा तर राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल चांगला दिसतो, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत देवोलीनाला पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत कोणत्याही व्यक्तीचे गुण महत्त्वाचे असतात, ती व्यक्ती कशी दिसते ते नाही.
रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019 शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या सगळ्यात जेव्हा देवोलीनानं शहनवाजशी लग्न केलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहेत
देवोलीनानं या 'साथ निभाना साथीया' मालिकेत गोपीची भूमिका साकारली होती. नंतर, अभिनेत्रीनं 'लाल इश्क' सारख्या शो आणि 'साथ निभाना साथिया'च्या दुसऱ्या सीझनमध्ये काम केले. देवोलीना 2019 मध्ये प्रसारित झालेल्या 'बिग बॉस 13' चा देखील एक भाग होती. देवोलिना सगळ्यात शेवटची 'बिग बॉस 15' मध्ये दिसली होती.