Devoleena Bhattacharjee Slams Troller Over Marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत आफताबची आठवण करून दिली होती. तर आता काही नेटकऱ्यांनी तिची मुलं कोणता धर्म स्विकारतील हा प्रश्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवोलीनानं कधीच कोणाला कळू दिलं नाही की ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. देवोलीनानं लग्नानंतर फोटो शेअर करत तिच्या पतीविषयी सगळ्यांना जाहिरपणे सांगितले. देवोलीनानं तिच्या लग्नाची बातमी देताच काही नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. यावेळी देवोलीनानं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांपैकी काही लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. 



देवोलीनाला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला की 'तुझी मुले हिंदू असतील की मुस्लिम?' या प्रश्नावर सडेतोड उत्तर देत देवोलीना म्हणाली, 'माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम, हे विचारणारे तुम्ही कोण? जेव्हा तुम्हाला मुलांची एवढी काळजी वाटते, अनेक अनाथाश्रम आहेत, तेव्हा जा, दत्तक घ्या आणि स्वतःनुसार धर्म आणि नाव ठरवा. माझा पती, माझी मूल, माझा धर्म, माझे नियम. तू कोण आहेस मला विचारणारा? #विषारी'  ट्रोल झाल्यानंतर त्या नेटकऱ्यानं स्वत: त्याच ट्वीट डिलिट केलं. 


हेही वाचा : Avatar 2 Collection : लवकरच करणार 100 कोटींचा आकडा पार, दुसऱ्या दिवशीच केली बक्कळ कमाई


इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी ट्वीट करत तिला शहनवाज शेखसोबत लग्न केल्यानंतर आफताबची आठवण करून दिली. असे अनेक ट्वीट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. देवोलीनानं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, जेव्हा देवोलीनानं लग्नानंतर तिचे शहनवाजसोबत फोटो शेअर केले होते. तर सगळ्यांना आश्चर्य झाले. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019  शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.