Avatar 2 Collection : लवकरच करणार 100 कोटींचा आकडा पार, दुसऱ्या दिवशीच केली बक्कळ कमाई

Avatar The Way of Water हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे. 

Updated: Dec 18, 2022, 02:38 PM IST
Avatar 2 Collection : लवकरच करणार 100 कोटींचा आकडा पार, दुसऱ्या दिवशीच केली बक्कळ कमाई  title=

Avatar The Way of Water Collection Day 2 : जेम्स कॅमरून (James Cameron) यांचा बहुचर्चित 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा हॉलिवूडपट अखेर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहतो होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. चित्रपट रिलीज होताच, #AvatarTheWayofWater ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले असून दुसऱ्या दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली असून चित्रपट लवकरच 100 कोटींचा गल्ला करणार आहे. 

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार: द वे ऑफ वॉटर' भारतात बॉक्स ऑफिसवर कमालीची कामगिरी करत आहे. हा चित्रपट भारतातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा हॉलीवूड ओपनर ठरला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 41 कोटींचा गल्ला केला ज्यामध्ये इंग्रजीमध्ये 21.7 कोटी आणि हिंदीमध्ये 11.5 कोटींचा समावेश आहे. याशिवाय तेलुगू आणि तमिळ भाषेतही चांगलं कलेक्शन केले आहे.  

हेही वाचा : तु कुठची IAS अधिकारी आहेस का? या टोमण्यानंतर MBBS सोडून महिला झाली...

'अवतार: द वे ऑफ वॉटर'नं शनिवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 12% ची वाढ झाली आहे. बॉलिवूड हंगामा नुसार, चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 45 ते 47 कोटीं रुपयांचा व्यवसाय केला. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन 87 कोटींच्या वर गेले आहे आणि ते इतर तीन 100 कोटींच्या पुढे जाईल. रविवारी म्हणजे आज सुट्टी असल्यानं याची लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

चित्रपटानं फक्त वीकेंडच्या शेवटी भारतात 130 कोटींपर्यंतची कमाई करण्याची शक्यता आहे. हा भारतातील चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आहे. यासोबतच हा चित्रपटही अल्पावधीतच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जाते.

चित्रपटादरम्यान मृत्यू

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम शहरामध्ये अवतार चित्रपट पाहत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मीरेड्डी श्रीनू असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो  आपल्या भावासोबत पेद्दापुरम येथे अवतार 2 चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. मात्र चित्रपट पाहत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लक्ष्मीरेड्डी श्रीनू याच्यामागे एक मुलगी आणि एक मुलगा आहे.