मुंबई : मराठी ब्लॉकबॉस्टर सिनेमा सैराटच्या हिंदी रिमेकबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्याजान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिवर चांगली ओपनिंग केली आहे. आपल्या दमदार कलेक्शनमुळे या सिनेमाने दोन मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ट्रेन अनालिस्टनुसार, पहिल्या दिवशी धडक ७ कोटींची कमाई करेल, असा अंदाज होता. 


इतकी आहे पहिल्या दिवसाची कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीच्या डेब्यू सिनेमा असूनही या सिनेमाने चांगलीच कमाई केली. ट्रेन अनालिस्ट तरण आदर्शनुसार, धडकची पहिल्या दिवसाची कमाई ८.७१ कोटी इतकी होती. या सिनेमाने करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चा रेकॉर्ड तोडला. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला असून त्याची पहिल्या दिवसाची कमाई ८ कोटी इतकी होती.


२०१८ चा हायएस्ट ओपनर


धडकचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला असून २०१८ चा हायएस्ट ओपनर सिनेमा 'राझी' ची जागा आता 'धडक'ने घेतली आहे. वीकेंडला सिनेमा अधिक कमाई करेल, अशी आशा आहे.