धनुष आणि ऐश्वर्या येणार एकत्र? विभक्त झाल्यानंतर दीड वर्षातच पुन्हा करणार पॅचअप
Dhanush and Aishwarya Rajinikanth Patch-up: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी गेल्या वर्षी विभक्त होणार असल्याचे सांगितलं होते. दरम्यान, त्याच्या दीड वर्षात ते एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Dhanush and Aishwarya Rajinikanth Patch-up: दाक्षिणात्य लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता धनुष आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत आहे. त्या दोघांनी 18 वर्षे सुखी संसार केल्यानंतर 2022 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते दोघं विभक्त झाल्यानंतर त्या दोघांना त्यांचा मोठा मुलगा यात्राच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र पाहिलं होतं. त्यात आता अशी चर्चा सुरु आहे की विभक्त झालेलं हे कपल लवकरच एकत्र येणार आहे. दरम्यान, एका रिपोर्टनुसार असं समोर आलं आहे की ते दोघं एकत्र येत नसून त्यांच्या मुलांच्या को-पेरेंटिंगसाठी एकत्र आले आहेत.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतर त्या दोघांनी हा निर्णय मागे घेतल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, धनुष आणि ऐश्वर्या हे त्यांच्यात असलेले मतभेद दूर करत नाही आहेत तर ते विभक्त झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या आयुष्यात ते पुढे झाले आहेत. त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील या सगळ्या गोष्टींना एक्सेप्ट केलं आहे. त्यांना ही गोष्ट कळली आहे की ते एकत्र राहू शकत नाही.
एकत्र येऊन करतायत को-पेरेंटिंग!
ऐश्वर्या आणि धनुष दोघे आता यात्रा आणि लिंगा या त्यांच्या दोन्ही मुलांची को-पेरेंटिग करण्याची प्लॅनिंग करत आहेत. सुत्रांनुसार, 'ते दोघं सगळे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, तर असं नाही. जिथे घटस्फोटाची गोष्ट येते, तिथे त्या दोघांनी असं अद्याप दाखल केलेला नाही, म्हणून ते वेगळे झाले आहेत, तर दुसरीकडे न्यायालयीन असा कोणताही अर्ज नाही. ते घटस्फोट दाखल करणार नाही आहेत. त्या दोघांपैकी कोणाला पुन्हा लग्न करायचे असेल तरच ते घटस्फोट घेणार आहेत. मात्र, सध्या अशी काही परिस्थिती नाही आहे. ते एकत्र राहत नाहीत, परंतु एकमेकांचा आदर करतात आणि त्यांच्या मुलांच्या फायद्यासाठी चांगले संबंध सामायिक करतात. सध्या ते दोघे त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त आहेत आणि को-पेरेंटिंगसाठी मार्ग शोधत आहेत. ते आपल्या मुलांना एकत्र मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्या दोघांपैकी कोणालाही एकट किंवा आपण आपल्या मुलांसाठी काही करत नाहील आहोत असं वाटणार नाही.'
ऐश्वर्या आणि रजनीकांतचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ऐश्वर्या ही एक लोकप्रिय दिग्दर्शिका आहे. ती सध्या 'लाल सलाम' या तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णु विशाल हे मुख्य भूमिका साकारणार आहेत. त्या चित्रपटात रजनीकांत यांची पाहुण्या कलाकारांची भूमिका असणार आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे आणि पोंगल 2024 ला हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. धनुष विषयी बोलायचे झाले तर तो 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण मथेश्वरन यांनी केले आहे. तर आणखी एक चित्रपट असून त्या चित्रपटात धनूष अभिनयासोबत दिग्दर्शन देखील करणार आहे. याशिवाय धनुषकडे शेखर कम्मुला आणि अरुण माथेस्वरन यांचे चित्रपट देखील आहेत.