प्रशांत जाधवसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : चेहऱ्याने गोड, सालस आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एकदम राऊडी आहे. तीने लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानपणी मूल जरा घाबरूनच असायची अशी कबुली दिली आहे खुद्द तेजस्विनी पंडित हिने... झी स्टुडिओचा नवीन वर्षात येणारा ये रे ये रे पैसा या चित्रपटाचे ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च कार्यक्रमात तेजस्विनीने 24taas.com शी खास गप्पा मारल्या. 


तेजस्विनीने सांगितला किस्सा...



लक्ष्मी रोडची दीपिका पदुकोण....


या चित्रपटात तिला लक्ष्मी रोडची दीपिका पदुकोण म्हटले आहे. तिची भाषा एकदम राऊडी आहे. तिचे डायलॉग डिलीवरी एकदम ढासू आहे. तिचा अंदाजही भारी वाटला आहे. 


रावडी लहानपणापासूनच... 


लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या होत्या. एकदा काही तरी मॅटर झाला आणि समोरच्या मुलांनी हॉकी स्टिक आणि ट्यूबलाइट घेऊन आम्हांला मारायला आले. माझ्या मित्राला त्यांनी खूप मारले. मी पण घरी गेली आणि घरून ट्यूबलाइट घेऊन आली. मग त्या मुलांना चांगला चोप दिला. 


घरी प्रकरण कळाल्यावर घरच्यांना धक्का बसला. मग पोलिस स्टेशनमध्ये प्रकरण गेले तर पोलिसांनी पट्टा काढला आणि केलेल्या चुकीबद्दल मला त्यांना पट्ट्याने बडवायला सांगितले. 


ये रे ये रे पैसा चा ट्रेलर