अभिनेत्याच्या पत्नीची कमाल, ब्रेस्ट मिल्क आणि बाळाच्या नाळेपासून बनवला `हा` दागिना!
Dheeraj Dhoopar and Vinny Arora : धीरज धूपरची पत्नी आणि अभिनेत्री विन्नी अरोरानं सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्कसाधत मुलाची आठवण जपण्यासाठी एक नवा मार्ग निवडला आहे. तिनं चक्क ब्रेस्ट मिल्क आणि नाळेपासून एक दागिना बनवला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता धीरज धूपर (dheeraj dhoopar) हा ससुराल सिमर का या मालिकेसाठी ओळखला जातो. तर त्याची पत्नी विन्नी अरोरा (Vinny Arora) ही देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीच विन्नीनं मुलाला जन्म दिला. त्यानंतर धीरज आणि विन्नी सोशल मीडियावर मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. दरम्यान, नुकतीच विन्नीनं सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी विन्नी 'आस्क मी एनीथिंग' द्वारे चाहत्यां संपर्कात राहिली. त्यावेळी विन्नीनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी विन्नीनं खुलासा केला ही तिच्या गळ्यात असलेलं पेन्डंट हे तिच्यासाठी खूप खास आहे. हे साधंसुधं पेंडंट नाही. कारण, ते तिच्याच Breast Milk आणि बाळाच्या नाळेपासून तयार करण्यात आलं आहे.
विन्नीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांशी 'आस्क मी एनीथिंग' द्वारे संपर्क साधला. यावेळी एका नेटकऱ्यानं तिच्या गळ्यात असलेल्या नेकलेसविषयी विचारलं. त्यावर उत्तर देत विन्नीनं त्या नेकलेसचं महत्त्व सांगितलं आहे. विन्नी म्हणाली, पेंडेन्ट जे आहे ते तिच्या ब्रेस्ट मिल्कपासून आणि तिच्या मुलाच्या नाळेपासून बनवण्यात आलं आहे. तिनं या पेन्डंटचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
ऑगस्ट महिन्यात धीरज धूपर आणि विन्नी हे पालक झाले. तर वडील झाल्यानंतर धीरजनं IndiaTodayin ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की तो खूप उत्साही आणि आनंदी आहे. पण जर तुम्ही मला तयारी विषयी विचाराल तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ते काम कराल तेव्हा तुम्ही त्यासाठी तयार व्हाल. मला वाटतं नाही की कोणी सांगितलेल्या गोष्टींनी असं कोणी त्यासाठी तयार होईल. कारण आता सगळ्याच गोष्टी या नव्या आहेत आणि जेव्हा असं होतं तेव्हाच आपण यातून शिकतो. आपल्यासमोर एक नवीन जीवन असतं आणि घरात उत्साह असतो. मी त्या सगळ्या क्षणांना जगण्यासाठी उत्साही आहे.
हेही वाचा : 'घराचा कॅफे केलाय बाईने...', मराठमोळ्या अभिनेत्रीच्या त्रस्त नवऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी मुलाच्या जन्मानंतर धीरजनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्या फोटोत त्याच्या मुलानं त्याचा एक बोट धरला होता.हा फोटो शेअर करत धीरजनं 'ही एकमेव जागा आहे जिथे मला जायचं आहे.' तर विन्नीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचे दोन फोटो दिसत आहेत. तर विन्नीनं कॅप्शन दिलं होतं की 'आता माझ्याकडे तुम्ही दोघे आहात.'