मुंबई : सेल्फी मैने लेली आज या गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ढिंचॅक पूजाचं नवं गाणं आलं आहे. बापू दे दे थोडा कॅश हे गाणं ढिंचॅक पूजानं यूट्यूबवर अपलोड केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढिंचॅक पूजा तिच्या बेसूर आणि कर्कश आवाजामुळे चर्चेत आली होती. सेल्फी मैने लेली आज या गाण्यानंतर तिनं दारू-दारू, स्वॅगवाली टोपी आणि दिलों के शूटर है मेरा स्कूटर ही गाणीही यूट्यूबवर अपलोड केली होती. पण ढिंचॅक पूजाचं चॅनल हॅक झाल्यामुळे तिच्या गाण्यांचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट झाले होते. आधीच्या चारही गाण्यांमध्ये ढिंचॅक पूजा व्हिडिओमध्ये दिसत होती पण आताच्या या नव्या गाण्यामध्ये ढिंचॅक पूजा दिसत नाही.


पाहा ढिंचॅक पूजाचं नवं गाणं