Dia Mirza लवकरच होणार आहे, बेबी बंप केले फ्लॉन्ट
15 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकली दिया मिर्झा
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) गरोदर असून ती पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नेसीची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. एक फोटो शेअर करून तिने चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. (Dia Mirza Pregnant, shared baby bump pic) मालदिवमध्ये सुट्टी घालवत असलेली दिया समुद्र किनारी असून तिने बेबी बंपवर हात ठेवला आहे. यावेळी तीने लाल रंगाची फ्लॉवरी आऊटफिट घातलं असून एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये दियाने लिहिलं आहे की,'सौभाग्य मिळालं आहे. धरती मातेसोबत एक होण्याचं.... जीवनातील शक्तींमध्ये एक होण्याचं.... अनेक गोष्टी, अंगाई आणि गाण्यासोबत एक होण्याचं.... अनेक आशांसोबत एक होण्याचं.... सौभाग्य मिळालं आहे ... गर्भात असेलल्या एक बाळाला सांभाळण्यात धन्यता मिळण्याचा... '
कमेंटमध्ये शुभेच्छांचा वर्षाव दियाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर कौतुकांचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते देखील कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा देत आहे. अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये विक्रांत मेस्सी, विशाल दललानी यासारख्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मालदीवमध्ये घालवतेय सुट्टी दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मालदीवमध्ये आपला वेळ घालवत आहे. पती वैभव रेखी आणि सावत्र मुलगी समायरासोबत सुट्ट्या घालवत आहे. एका सुंदर आयरलँडचा फोटो तिने शेअर केला आहे. समायरा आणि दियाची सुंदर बॉन्डिंद पहायाला मिळत आहे.
15 फेब्रुवारीला दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधली. वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो.