दीया मिर्झाच्या हनीमून फोटोमध्ये `ती` कोण?
दीयाने तिच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मुंबई: दीया मिर्झा कायमच सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे 4.4 million फॉलोअर्स (Followers) आहेत. दीया तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया पेज वरून देताना दिसते.
हल्ली दीया मिर्झा मालदीवमध्ये तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. दीयाने तिच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अलीकडेच तिने तिचे बिकिनीमध्यील फोटो शेअर केले होते. आता तीने काही पांढऱ्या मॅक्सीमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्याबरोबर एक मुलगी दिसत आहे आणि फोटोतील दीयाबरोबर दिसणारी ही मुलगी कोण अशी सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.
दीयाबरोबर दिसणारी ही मुलगी वैभव रेखी यांची मुलगी समायरा म्हणजेच दीया मिर्झाची सावत्र मुलगी आहे. दीया मिर्झाने 15 फेब्रुवारी रोजी उद्योगपती वैभव रेखा यांच्याशी लग्न केले. दीया मिर्झाचे वैभव रेखी यांच्याशी हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी दीयाचे साहिल संघाशी लग्न झाले होते. 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला.