मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात मिळवली आहे. सोनालीला 'हाय ग्रेड' कॅन्सर झाला होता. तेव्हापासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती. कॅन्सर सारख्या आजाराचे वेळेत निदान लागणे फार गरजेचे आहे. असे वक्तव्य सोनलीने केले आहे. जूलै २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सर झाला होता. उपचारानंतर ती डिसेंबरमध्ये आपल्या मायदेशी परतली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली पाचव्या आंतरराष्टीय संम्मेलन 'काहोकोन २०१९' मध्ये उपस्थित होती. कॅन्सरचे लवकर निदान लागल्यास त्यावर उपचार घेणे सोपे जाते, त्याचप्रमाणे त्रासही कमी होतो. महत्वाचे म्हणजे उपचारासाठी पैसेही कमी लागतात. त्यामुळे खचून न जाता समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संयम आणि आत्मविश्वसाची फार गरज आहे, असे वक्तव्य तिने केले.


त्याचप्रमाणे कॅन्सर फार वेदना देणारा आजार आहे. त्यामुळे लवकर माहित  झाल्यास होणारा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. समाजात कॅन्सर या आजारावर चर्चा होणे फार गरजेचे आहे. या कार्यक्रमा वेळेस सोनालीने तिचा अनुभव चाहत्यांसमोर मांडला. या काळात ती नियमितपणे इन्स्टाग्रामवर फोटो टाकून आपले अनुभव चाहत्यांना  सांगायची. यादरम्यान काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन तिची भेट घेतली होती. स्वत:च्या आत्मविश्वसाच्या जोरावर तिने कॅन्सर सारख्या आजारावर मात केली. आता ती तिचे आयुष्य आपल्या कुटुंबासह आणि मित्र परिवारासह स्वछंदी जगत आहे.