पुण्याच्या रस्त्यांवर फिरत होता `दिलजीत दोसांझ!` कुणी ओळखलंच नाही, VIDEO VIRAL
Did Diljit Dosanjh Walked in on Pune Roads : खरंच दिलजीत दोसांझ दिसला पुण्याच्या रस्त्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल...
Did Diljit Dosanjh Walked in on Pune Roads : लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या चाहत्यांविषयी सांगण्याची काही गरज नाही. आपण सगळेच त्याचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर पाहतोय. फक्त भारतात नाही तर परदेशात देखील त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या दिलजीत हा 'दिल-लुमिनाटी टूर' वर आहे. या टूरसाठीचे त्याचे कॉन्सर्ट हे दिल्ली, जयपुर, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे झाले. आता त्याचा पुढचा कॉन्सर्ट हा 24 नोव्हेबंर रोजी पुण्यात होणार आहे. त्या आधी दिलजीतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण त्याला कोणी ओळखलंच नाही.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत खरंच दिलजीत नाही. दिलजीत बनून इथं फिटनेस ट्रेनर सिमरजीत सिंग पुण्याच्या रस्त्यावर फिरताना दिसला. त्याच्यासोबत बॉडीगार्ड देखील होते, जे पूर्णवेळ दिलजीतसोबत दिसत होते. यावेळी सिमरजीत हा ओळख पटू देऊ नये म्हणून ग्लेअर्स घातले आणि बंदाना तोंडावर फिरून घेतला. अशात सिमरजीत सिंगला पाहून तिथे असलेल्या लोकांना तो दिलजीत वाटला आणि ते त्याच्यासोबत फोटो काढू लागले. सिमरजीतनं सगळं काही अगदी दिलजीतसारखं हुबेहुबे दिसावं यासाठी बाऊंसर्स वगैरे देखील ठेवले.
सिमरजीतनं दिलजीतची कपड्यांची स्टाइल पासून त्याच्या चालण्याची स्टाईल आणि बॉडी लॅन्गवेज सगळं काही परफेक्ट करण्यासाठी कॉपी केलं. त्यामुळे त्याला पाहून कोणालाही तो दिलजीत नसून सिमरजीत आहे असं वाटलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सिमरजीतच्या व्हिडीओवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी त्याला सस्ता दिलजीत म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला दिलजीत फ्रॉम मीशो, दिलजीत फ्रॉम मिंत्रा म्हटलं आहे. तर काहींनी सिमरजीत आणि दिलजीतची उंची सारखी नाही असं म्हटलं आहे. सिमरजीतच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओला 4.5 मिलियन व्ह्युज मिळाले. सिमरजीतच्या या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी त्यानं अगदी सहज चांगला अभिनय केल्याचं म्हटलं आहे.
याशिवाय सिमरजीतनं हे व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की "मला आशा आहे की दिलजीत दोसांझ भावाची लीगल टीम आमच्यावर कोणता दावा ठोकणार नाही. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हे सगळं त्यामुळेच केलं आहे. तुम्ही आमच्या शहरात आलात त्याचाच उत्साह हा आहे. पुणेकर तुमचं स्वागत करत आहेत."