Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या कार्यक्रमानं प्रेक्षकांना हसवून सोडलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यांची कॉमेडी टायमिंग आणि त्यांचे विनोद हे प्रेक्षकांना हसवून सोडतात. तर आता एका दुसऱ्याच गोष्टीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ती म्हणजे हास्यजत्रा फेम गौरव मोरे आता एका हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसला. गौरवनं आता हिंदी कॉमेडी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरव हा मॅडनेस मचाएंगे या शोमध्ये दिसला. या कार्यक्रमातील त्याच्या एन्ट्रीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. गौरवचा या शोमधील प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये गौरव मोरे, अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांचं एक स्कीट पाहायला मिळत आहे. त्यांच्या या स्किटचा प्रोमो पाहून प्रेक्षक पोटधरून हसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गौरव मोरे हा प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की "हास्यजत्रा सोडू नका गौरव राव." दुसरा नेटकरी म्हणाला, "मला आशा आहे की तुम्ही हास्यजत्रा नाही सोडली. मराठी माणसानं मराठी मध्येच रहावं." तिसरा नेटकरी म्हणाला की "कमाल गौरव दादा, तुझ्यावर अभिमान आहे." आणखी एक नेटकरी म्हणाला की, "भाई तू हस्य जत्रेतच भारी दिसतोस." दुसरा नेटकरी म्हणाला, "हास्य जत्रा सोडू नको." तिसरा नेटकरी म्हणाला, "गौरव तुझ्यावर खूप अभिमान आहे. मस्त सुरु आहे." आणकी एक नेटकरी म्हणाला "भाई, खूप मस्त. तुला पाहून आनंद झाला." हे पाहता अनेक नेटकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित राहिला की गौरव मोरेनं हास्यजत्रा सोडली की काय? गौरवची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 


हेही वाचा : गादीवर गुलाबाच्या पाकळ्या, फुलांच्या माळा अन्..., अंकिता लोखंडेनं शेअर केले विकीसोबतचे रोमॅन्टिक बेडरूम फोटो


गौरवच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती ‘अल्याड पल्याड’ या शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट देखील आहे. तर हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.