मुंबई : विरूष्काने इटलीमध्ये ११ डिसेंबर रोजी डेस्टिनेशन वेडिंग केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची घोषणाही केली.  आता अनुष्कानंतर अजुन एक बॉलिवूडची अभिनेत्री लग्नबंधनात अडकली. तेही विरूष्काप्रमाणेच गुपचूप !  


इलियानाने केलं लग्न ? 


इलियानाने इंस्टाग्रामवर आपला एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे इलियानाचे फॅन्सही विचारात पडले आहेत. इलियानाचे  कॅप्शन  वाचून सारेच गोंधळात पडले आहेत. इलियानाने शेअर केलेला फोटो हा तिच्या पतीने क्लिक केल्याचा उल्लेख तिने केला आहे. इलियानाचा बॉयफ्रेंड एंड्रय कीबोन यालाही टॅग करण्यात आलं आहे.  


 



 


इलियानाने शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडलाही टॅग केले आहे. मात्र ती कधीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियामध्ये बोलत नाही. 


ख्रिसमस आणि इलियाना 


इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ख्रिसमस ट्री सजवताना दिसत आहे. हा सण माझ्यासाठी खास असल्याचे तिनं म्हटले आहे. 'फेवरेट टाईम ऑफ द इयर' अशा आशयाचे कॅप्शन तिने लिहले आहे.