Karishma Kapoor Abhishek Bachchan: करिश्मा कपूरचं अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न होणार होतं. परंतु काही कारणास्तव त्यांचे लग्न काही होऊ शकले नाही हे आपल्याला माहितीच आहे. 2003 साली अभिषेक बच्चन यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'मैं प्रेम की दिवानी हूं' हा अभिषेक बच्चनचा पहिला कर्मशियल चित्रपट होता. करिना कपूर, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई केली होती. त्यानंतर करिश्मा आणि अभिषेकचं होणार लग्नही मोडलं आणि त्यांच्या लग्नाच्या सुरू असलेल्या चर्चा तिथेच थांबल्या. 2007 साली अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नालाही आता 16 वर्षे झाली असून आराध्या बच्चन ही त्यांनी लाडकी कन्याही 12 वर्षांची झाली आहे. परंतु करिश्मा आणि अभिषेकचं लग्न नक्की का तुटलं? यामागे नक्की काय कारणं होतं यावर आजही चर्चा होते. त्यांचं नातं तुटायला खरंच जया बच्चन कारणीभूत होत्या का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अभिषेक बच्चन आणि  करिश्मा कपूर एकमेकांसोबत फारसे स्पॉटही होताना दिसत नाहीत. 2002 साली करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटल्यानंतर पुढच्यावर्षी 2003 मध्ये तिनं सुंजय कपूरशी लग्न केले. परंतु त्यांचाही 2016 मध्ये घटस्फोट झाला. त्यांनाही दोन मुलं आहेत. आज करिश्मा सिंगल असून सिंगल परेंटही आहे. परंतु घटस्फोटानंतरही त्यांचे संबंध चांगले आहेत. ते आपल्या मुलांसाठी एकत्र भेटताना दिसतात. 


नक्की काय घडलं होतं? 


2002 साली करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता. एका कार्यक्रमात अभिषेकची होणारी बायको आणि आपली सून म्हणून जया बच्चन यांनी सर्वांची ओळख करून दिली होती. परंतु अचानक काय झालं हे काहीच कळलं नाही. परंतु त्याचं नातं हे तुटलं. नक्की कोणामुळे हे नातं तुटलं याबाबत दोन्ही परिवारांनी गोपनियता पाळली होती. 


काय होती ती अट? 


यामध्ये जया बच्चन यांची एक अट होती. जी करिश्मा कपूरला मुळीच पसंत नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा करिश्मा कपूर ही अत्यंत पीकवर होती. तेव्हा लग्नानंतर सिनेमे न करण्याची अट त्यांनी करिश्मासमोर ठेवली होती. यावर करिश्माची नाराजी होती. त्यामुळे तिनं हे नातं तोडलं. असेही म्हणतात की करिश्माच्या या निर्णयामागे तिची आई बबिता कपूरही होत्या.