मुंबई : नाव न घेता अभिनेत्री कंगना राणौतने अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने दीपिकाचं नाव न घेता ट्विट केलं आहे. यामध्ये तिन्हे २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'जजमेंटल है क्या' सिनेमावरून झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने शनिवारी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक ट्विट केलं आहे. यामध्ये तिने एका सिनेमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मानसिक आरोग्याची जागकृता निर्माण करण्यासाठी एक सिनेमा तयार केला होता. मात्र डिप्रेशनचं दुकान चालवणाऱ्यांनी तर त्याला न्यायालयातच नेलं. मीडियाचा विरोध झाल्यानंतर या सिनेमाचं नाव बदल्यात आलं. सिनेमा खूप चांगला आहे. आजच्या दिवशी तुम्ही बघा. 



'जजमेंटल है क्या' या सिनेमाचं नाव 'मेंटल है क्या' असं होतं. मात्र काही लोकांना हे असंवेदनशील असल्याचं वाटलं. त्यामुळे निर्मात्यांना सिनेमाचं नाव बदललं. या सिनेमांत राजकुमार राव देखील होता.