Sobhita Dhulipala-Naga Chaitanya : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभूचं लग्न 2017 मध्ये झालं. लग्नानंतर त्या दोघानी 'मजिली' चित्रपटात एकत्र काम केलं. त्यावेळीच शोभितासोबत झालेल्या मैत्रीनं सगळं काही खराब झालं का? तर नागा चैतन्य आणि शोभितामध्ये वाढलेल्या जवळीकतेमुळे सगळं काही संपलं? असे अनेक प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थि झाले नेमकं काय आहे ते जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर नागा चैतन्यचं करिअर हे जेव्हा यशाच्या शिखरावर होतं तेव्हा तो आणि समांथा रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केलं. त्या दोघांना पाहून सगळ्यांना आनंद झाला आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये तर त्यांची चांगलीच चर्चा रंगायची. पण काही कारणांमुळे ते विभक्त झाले. घटस्फोटाच्या काही दिवसांनंतर नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, त्यानंतर या चर्चा सत्यात उतरल्या. 8 ऑगस्ट रोजी त्या दोघांना गुपचूप साखरपुडा केला. तर डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न बंधनात अडकले.


हे सगळ्यांना माहित आहे पण अशा बातम्या समोर आल्या आहेत की नागा चैतन्य आणि समांथाला शोभिता धूलिपाला ही आधीपासून ओळखत होती. ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शोभितानं नागा चैतन्य आणि समांथासोबत एका चित्रपटात काम केलं आहे. 


नागा चैतन्य आणि समांथानं 'ये माया चेसावे', 'मनम', 'मजिली', 'आटो नगर सूर्या' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मजिली' या चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दिव्यांश कौशिक देखील होती. जिच्यावर नागा चैतन्यचं आधी प्रेम होतं. दुसरीकडे समांथा ही नागा चैतन्यवर प्रेम करायची. या भूमिकेसाठी दिव्यांश आधी दिग्दर्शकानं शिव निर्वाणनं शोभिता धूलिपालाची निवड केली. काही सीन्स शूट केल्यानंतर काही कारणांमुळे तिला या चित्रपटातून काढण्यात आलं.


हेही वाचा : 'या' अभिनेत्याच्या प्रेमात वेडा झाला होता करण जोहर, लग्नानंतरही सोडलं नाही! Video झाला Viral


दरम्यान, सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. शूटिंग दरम्यान, शोभिता आणि नागा चैतन्य यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यामुळे पुढे नागा चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट झाल्याचे म्हटले जाते. मात्र, यात किती सत्य आहे हे कोणालाही माहित नाही.