मुंबई : तरूणाईत टिकटॉक हे ऍप अतिशय लोकप्रिय आहे. सध्या टिकटॉकवर 'मधुबाला' या नावाने एक मुलगी अतिशय लोकप्रिय होत आहे. ही मुलगी मधुबालाच्या गाण्यांवर व्हिडिओ करून टिकटॉकवर टाकत आहे. तसेच ती अगदी मधुबालाच्या अंदाजात दिसते. सध्या तिचे व्हिडिओ अतिशय हिट होत आहेत. पण ही मुलगी कोण आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या एक्सप्रेशनने नेटीझन्सना घायाळ करणारी सोशल मीडियावरील 'मधुबाला'चं नावं प्रियंका कंडवाल आहे. प्रियंका ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय हिंदी मालिकेत तिने डॉ. गौरी शहाणेची भूमिका साकारली होती. 



तसेच 'जाना ना दिल से दूर' या मालिकेसोबतच तिने दाक्षिणात्या सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. 'मरिअम खान', 'स्टाईल', 'निनादे ना' या कन्नड तसेच मल्याळम चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. 



प्रियंका फॅशन ब्लॉगर असून तिचे हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच कतरिना कैफशी देखील प्रियंकाचा चेहरा मिळता जुळता असल्याचं म्हटलं जात आगे. इंस्टाग्रामवर 30 हजारहून अधिक फॉलोअर्स आहे


.



प्रियंकाचे सर्वाधिक व्हिडिओ हे ब्लॅक अँड व्हाइट टोनमधील असतात त्यामुळे ते 60 च्या दशकातील काळ उभा करतात. प्रियंकाच्या अदा, तिचे हावभाव, कपडे या सगळ्याच गोष्टी पुरक ठरतात.