मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं 14 जून 2020 रोजी निधन झालं. त्याच्या निधनानंतर 'दिल बेचारा' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात आलं. प्रेक्षकांनी या सिनेमावर आणि सुशांतवर भरभरून प्रेम केलं. मात्र सुशांतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' मधील काही सीनला सुशांतचा आवाज नाही. सुशांत ऐवजी एका आरजेने या सिनेमाकरता डबिंग केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिल बेचारा' सिनेमातील काही सीनमध्ये सुशांतचा आवाज नाही. या सिनेमाकरता आरजे आदित्यने आपला आवाज दिला आहे. हे त्याने स्वतः मिस मालिनीला एका मुलाखतीत सांगितलं. एक दिवस मुकेश छाबडा यांच्या ऑफिसमधून एक व्यक्ती आला. सुशांतची मिमिक्री करणार का? असा प्रश्न केला. याकरता त्यांनी मला 'एम एस धोनी सिनेमातील एक क्लिप ऐकायली दिली. मी त्याचा आवाज कॉपी केला नाही तर त्याच्यासारखा आवाज कॉपी करण्याचा प्रयत्न केला. '



६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून सुशांतच्या शेवटचा सिनेमा असलेल्या 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ती ही त्याच्या आठवणीमध्ये ती भावूक झाली. श्वेता ने सोशल मीडियावर आपल्या भावासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे.


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील सुशांतच्या चाहत्यांनी एका बागेमध्ये सुशांतच्या स्मरणार्थ एक बेंच ठेवला आहे. त्याला 'सुशांत पॉईंट' असे नाव दिले आहे. या बेंचचा फोटो श्वेताने पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना श्वेता म्हणते, ' तो अजूनही जिवंत आहे...त्याचे नाव जिवंत आहे...त्याच्या जीवनाचे सार जिवंत आहे...एका पवित्र आत्माच्या हा परिणाम आहे. तू कायम जिवंत राहणार आहेस.