मुंबई : सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका हिट ठरल्यानंतर या सीरीजमधील दुसरी मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. मात्र पहिल्या मालिकेइतका प्रतिसाद या मालिकेला मिळू शकला नाही. 


या मालिकेत सखी गोखलेने परी, स्वानंदी टिकेकरने मुक्ता, पूजा ठोंबरेने आनंदी, सुव्रत जोशीने गौरव, अमेय वाघने साहिल आणि पुष्कराज चिरपुरटकरने पप्या राणेची भूमिका साकारलीये. अद्वैत दादरकरने याचे दिग्दर्शन केले संतोष काणेकर यांनी निर्मिती केलीये.